Dhule | Khuni Ganpati : हिंदू-मुस्लीम एकतेचा खुनी गणपती, गणेशाला खुनी गणपती नाव कसं पडलं?
महाराष्ट्रात गावोगावी वैशिष्टपुर्ण गणपतींची प्रतिस्थापना होते. त्यातचं एक अनोखी कहानी असणारा धुळ्यातील खुनी गणपती या गणपतला हे नाव कसं पडलं? हा प्रश्न अनेक लोकांना पडलेला आहे. याबद्दलची या खुनी बाप्पाच्या रहस्यमयी नामकरणाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. गणपती बाप्पा आता थोडेचं दिसव लांब आहेत बाप्पा आले की, संपूर्ण घर आणि घगरातील कुटुंब एकत्र येते. यादरम्यान बाप्पासंबंधी अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात याचपार्श्वभूमीवर बाप्पाच्या नामकरणावर ही एक अनोखी कहानी आहे. महाराष्ट्रात गाव तिथे गणपती पाहायला मिळतो. प्रत्येक गावातील गणपतीला एक इतिहास आहे.
धुळ्यातील खुनी गणपतीच्या नावाला सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे. हिंदू-मुस्लीम एक्याच प्रतिक असलेल्या खुनी गणपतीला हे नाव पडण्यामागे एक घटना कारणीभूत आहे. 1985 साली या गणपतीची प्रतिस्थापना करण्यात आली. ज्या मार्गावरून गणपतीची विसर्न मिरवणूक जात होती त्या मार्गावर गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीत दोन समाजात वाद झाला. हा वाद हिंदू-मुस्लीम अशा दोन समाजात असून या वादात मोठा संघर्ष निर्माण झाला आणि त्यामुळे वादग्रस्त स्थिती निर्माण झाली. ब्रिटीशांनी दोन्ही गटावर गोळीबार केला. गोळीबारात अनेक जणांचा मृत्यू झाला. तब्बल 5 दिवस या गणपतीची मुर्ती मशिदीसमोर होती. ब्रिटीशांनी हिंदू-मुस्लीम समाजात समेट घडवून आणला. या घटनेवरून या गणपतीला खुनी गणपती असं नाव पडलं.
अनंत चतुर्थीला नमाजची अजान होत असताना खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या अगदी समोर येते. मशिदीवरून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीमधून एक मैलाना येतो आणि तिथूनच आरतीचे ताट आणि गुलाबाच्या फुलांचा हार गणपतीला घालून मशिदीकडून बाप्पाची आरती केली जाते. एकीकडे आरती आणी दुसरीकडे अजान सुरु होते. तिथली आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्त होतो. या बाप्पाच्या प्रेमापोटी आणि भावपूर्ण श्रद्धेपोटी हे हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र बाप्पाची निर्मळ मनाने सेवा आणि भक्ती करतात. या हिंदू-मुस्लीम एक्याच प्रतिक म्हणून या बाप्पाला खुनी गणपती म्हणून ओळखले जाते.